दिल्लीत शिंदे यांना केवळ नमस्कार, मी शिवसेनेचाच; अर्जुन खोतकर

अर्जुन खोतकर यांचे स्पष्टीकरण
Arjun Khotkar
Arjun Khotkar

जालना - दिल्लीत महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यामुळे त्यांना नमस्कार केला. या सहज घडलेल्या भेटीनंतर मी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसे काही नसून मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

खोतकर म्हणाले, मी व्यक्तिगत कामाकासाठी चार दिवस दिल्लीत होतो. दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री शिंदे आणि माझी समोरासमोर भेट झाली. दोघांत नमस्कार झाला. नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. राज्याचे मुख्यमंत्री समोर आल्यानंतर नमस्कार करायचा नाही का? या सहज घडलेल्या भेटीनंतर माध्यमांत माझ्याबद्दल अफवा सुरू झाल्या. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नाही, होणार ही नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक असून आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com