Uddhav Thackeray : जालना मतदारसंघावर शिवसेनेचा दावा,अंबेकरांना उमेदवारी देण्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी मागणी

Uddhav Thackeray : जालना विधानसभा मतदारसंघावर शिवसेना पक्षाने दावा केला असून भास्कर अंबेकरांना उमेदवारी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
Uddhav Thackeray jalna
Uddhav Thackeraysakal
Updated on

जालना : जालना विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (उबाठा) पक्षाने दावा केला आहे. ही जागा पक्षाकडे घेऊन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकरांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पक्षाचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ही मागणी केली आहे.

शिष्टमंडळात तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, मुरली थेटे, देवनाथ जाधव, दीपक रणनवरे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, प्रभाकर उगले, हरिभाऊ शेळके, प्रभाकर घडलिंग, अंकुशराव राजेजाधव, अशोक खलसे, संदीप मगर, परमेश्वर डोंगरे, संतोष खरात, बळिराम ढवळे, सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती.

निवेदनात म्हटले आहे, की जालना विधानसभेत आजपर्यंत चार वेळा शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. जालना नगर परिषदेतही गेली अनेक वर्षे शिवसेनेचाच झेंडा होता. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com