शिवसेना पदाधिकारी पैसे कमवण्याच्या नादात, भुमरेंसमोरच भांडाफोड

शिवसेना
शिवसेनाsakal

बीड : आपले दैवत उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakeray) यांच्या विरोधात कोणी बोलले तर आम्ही सहन करणार नाहीत. आम्ही तीव्र आंदोलन करु, मात्र सर्व आघाड्यांच्या जिल्हाप्रमुखांना सोबत पाठवा. कारण, ते फक्त पैसे कमवण्याच्या नादात आहेत. सगळ्यांचे आपापले धंदे सुरु आहेत. नारायण राणेंविरुद्धच्या आंदोलनाला दोन्ही जिल्हाप्रमुख नव्हते, अशी खदखद आणि पक्षाअंतर्गत कपडेफाड खुद्द शिवसेनेचे (Shiv Sena) रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare) यांच्यासमोर उघड झाली. श्री.भुमरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२८) (Beed) आगामी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली. मात्र, बैठकीत काही शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांचे धंदेच समोर आणले. पक्षाअंतर्गत खदखदीपेक्षा उपस्थित केलेले मुद्दे पक्षाला विचार करायला लावणारे आहेत. आता याकडे पक्ष कशा पद्धतीने पाहणार आणि काय पावले उचलणार यावर पक्षाचे खरे भविष्य आहे.

शिवसेना
बायोडिझेलचा काळाबाजार, तिघा जणांना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) जिल्ह्यात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने केली. परंतु, आंदोलनामध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व अप्पासाहेब जाधव यांचा सहभाग नव्हता. नेमका हाच मुद्दा उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी संदीपान भुमरे यांच्यासमोर उपस्थित केला. पण, याच वेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा भांडाफोडही केला. आपले दैवत उद्धव ठाकरेंविरुद्ध एकाने पोस्ट टाकली तर आम्ही घरात घुसण्याच्या तयारीत होतो. आताही जायला तयार आहेत. पण, फक्त सर्व आघाड्यांच्या जिल्हाप्रमुखांना आमच्यासोबत पाठवा, कारण ते कुठेच नसतात. ते फक्त पैसे कमवण्याच्या नादात आहेत, त्यांचे धंदे आहेत, असेही वरेकर म्हणाले. आष्टी तालुकाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनीही आमच्या आष्टी - पाटोद्यात शिवसेनेचा संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा प्रमुख केवळ आम्ही बोलविले तर येतात. मात्र, त्यांनी स्वत:हून यावे असे सांगितले. उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी हद्दपारी झाली असल्याची खदखद व्यक्त केली.

शिवसेना
Corona Updates : नांदेड जिल्ह्यात पाच जण कोरोनाबाधित

पक्ष जर अशा वेळी मागे उभा राहत नसेल तर काम कसे करणार, असा सवाल उपस्थित केला. एकेकाळी जिल्ह्यातील सात पैकी सहा जागा लढणारी शिवसेना नंतर युतीमध्ये सहा पैकी एका जागेवर आली. ती एकमेव जागाही पुढे जिंकता आली नाही. अलीकडे तर लढाई दूरचं पण उमेदवार शोधतानाच पक्षाच्या नाकीनऊ येतो. मात्र, जिल्ह्याने अनेक कडवट आणि कट्टर शिवसैनिक पाहिलेले आहेत. त्यांची कडवट, आक्रमक आंदोलनेही पाहिलेली आहेत. आता पक्षाची ही गत का झाली? याचा विचार पक्ष कधी करणार? हे महत्त्वाचे आहे. गणेश वरेकर जरी प्रातिनिधीक स्वरूपात बोलले असले तरी सामान्यांमध्ये पक्षाची प्रतिमा नेमकी काय, याचा मागोवा पक्षाने आतातरी घ्यायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com