नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : राजू चापके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena taluka chief Raju Chapke

नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : राजू चापके

वसमत (परभणी) : कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातले असून सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आणि कोणीही घाबरून न जाता आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्या, काही अडचण असल्यास मला भ्रमणध्वनीवर संवाद साधा. मी व माझी शिवसेना सदैव आपल्या मदतीसाठी धावून येईल, अशी ग्वाही शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी दिली. तसेच वसमत येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे काम चापके यांनी केले.

यावेळी तालुकाप्रमुख राजू चापके व शिवसेनेच्या वतीने विविध कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी व सायंकाळी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची जार ची व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्ण व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख सुनिल काळे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, राजू पाटील इंगोले शहरप्रमुख काशिनाथ भोसले, तालुका उपप्रमुख विलासराव नरवाडे, टेंभुर्णी सर्कल प्रमुख दत्तराव भालेराव, खांडेगाव सर्कल प्रमुख राम साळवे, रुस्तुमराव सारंग, सतीश देशमुख, सतीश नादरे, लक्ष्मीकांत देशमुख, उप तालुका प्रमुख तुकाराम गरुड, नवराज चव्हाण, संदीप सोनवणे, रामप्रसाद हरबळे, माधवराव बेले, राम पाटील, सरपंच बद्रीनाथ कदम,

शिवराज यशवंते काशिनाथ सारंग, प्रमोद भुसारे, ओमकार बेंडे, संदिप भालेराव, उमेश पुरी, अवधुत पुरी, जंटी बेंडे, सुभाष सोळंके, बालाजी काळबांडे, गजानन सारंग, सुनिल पाटिल नादरे, रवी पाटील नादरे, भाई पाटील कऱ्हाळे, रावसाहेब कऱ्हाळे, शिवाजी कऱ्हाळे, व्यंकटेश कऱ्हाळे, सतीश कऱ्हाळे, विष्णू कऱ्हाळे, विनायक कऱ्हाळे, राज कऱ्हाळे, आदीं शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

राजु चापके यांनी लसीकरण मोहिमेची माहिती जाणून घेतली. तसेच काही अडीअडचणी असल्यास मदत करण्याचे आश्वासन कर्मचारी आणि रुग्णांना दिले. ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करावे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, व सर्वांनी लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन लस घ्यावी, तसेच सर्व नागरिकांनी अंगावर दुखणे न काढता थोडीशी ताप, खोकला, सर्दी व या व्यतिरिक्त कुठलेही लक्षण वाटले तर कोरनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके यांनी केले. तसेच खासदार हेमंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी रेमडीसीविर इंजेक्शन व ऑक्सिजन कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती राजू चापके यांनी सांगितली.

टॅग्स :Parbhani