
परभणी : जायकवाडी जलाशयातून परभणी टेलपर्यंत पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसेना कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १७) जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव घातला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.