

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुकुंदनगर येथील काशीविश्वनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्र व शिवजयंतीनिमित्त “शिवमहापुराण कथा” सोहळा उत्साहात संपन्न झाला. ‘शिव ते शिव’ या शिवमहापुराण कथेनिमित्त १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.