CM Announces Shivraj Patil Memorial in Latur
sakal
लातूर : सुसंस्कृत राजकारणाचा आणि निष्कलंक व्यक्तिमत्वाचा आदर्श घालून दिलेले माजी केंद्रिय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांचे लातूरात स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ७) येथे केली. हे स्मारक महापालिकेच्या आवारात उभे करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.