परभणीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी; काँग्रेसचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनभा - भाजप युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना 256 मते मिळाली आहेत. तर कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार माजी आमदार सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली.

परभणी : परभणी - हिंगोली  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे विप्लव बाजोरिया हे 35 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांना या निवडणुकीत धक्कादायक पराभव तोंड द्यावे लागले आहे.

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनभा - भाजप युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना 256 मते मिळाली आहेत. तर कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार माजी आमदार सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली.

अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांना केवळ चार मते मिळाली. त्यांनी मतदानाच्या चार दिवस आधी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा जाहिर केला होता. 16 मते बाद झाली. तर दोन मते नोटाला गेली. कॉग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराजय धक्कादायक मानला जात आहे. 

Web Title: ShivSena candidate Viplav Bajoria win in Parbhani legislative council election