बीडची जागा शिवसेनेलाच; उमेदवारी क्षीरसागरांना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीदरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना रोहयो आणि फलोत्पादान खात्याचे मंत्रीपद मिळाले. दरम्यान, युतीत बीडची जागा शिवसेनेची आहे.

बीड : युतीत शिवसेनेच्या हक्काची असलेली बीडची जागा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले असून राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित झाली. सोमवारी (ता. ३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फांर्म दिला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना रोहयो आणि फलोत्पादान खात्याचे मंत्रीपद मिळाले. दरम्यान, युतीत बीडची जागा शिवसेनेची आहे. परंतु, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांच्याकडून या जागेची मागणी होत होती. क्षीरसागर व मेटे दोघेही बीडमधून दावेदार असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. अखेर सोमवारी ही जागा युतीत शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना श्री. ठाकरे यांना अधिकृत उमेदवारीचा ‘एबी’ फॉर्म दिला. त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे होते.  

जयदत्त क्षीरसागर सध्या रोहयो व फलोत्पादन मंत्री आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाच्या उमेदवारीचा अधिकृत एबी फॉर्म दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena gives AB form to Jayadatta Kshirsagar in Beed