
परळी वैजनाथ : तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात शुक्रवारी (ता.०१) सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. 'बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.