शिवशाही बस ट्रकवर आदळळी, सहाजण जखमी

आखाडा बाळापूर ः हिंगोली ते नांदेड राष्‍ट्रीय महार्गावर शुक्रवारी सकाळी अपघातग्रस्‍त झालेली शिवशाही बस.
आखाडा बाळापूर ः हिंगोली ते नांदेड राष्‍ट्रीय महार्गावर शुक्रवारी सकाळी अपघातग्रस्‍त झालेली शिवशाही बस.

आखाडा बाळापूर, ः हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता.दहा) पहाटे पाचच्या सुमारास शिवशाही बस व ट्रकच्या अपघातात चालक वाहकासह चार प्रवासी असे सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गावर बस क्रमांक (एमएच १३ सीयु ६९८८) हदगाव-पंढरपूर जाणारी शिवशाही बस नांदेडकडून हदगावकडे जात होती. या वेळी भाटेगावजवळ बसच्या समोरून साखर घेवून येणारा ट्रक क्रमांक (सीजी सात - ८८५५) हा येत होता. भाटेगाव गावाजवळ बस चालकाने ट्रककडून बाजु घेण्याच्या प्रयत्‍न केला, मात्र या प्रयत्‍नात बस ट्रकवर आदळली. यात या अपघातात बस चालक ज्ञानेश्वर गोपीनाथ गाडेकर (वय ३९) वाहक माधव रामराव सोमोसे (वय ३८) हे दोघे गंभीर जखमी असून यांच्यासह प्रवासी विश्वास अंबादास पवार (वय ४८), नामदेव वासुदेव पवार (वय २८), इंदू नामदेव पवार (वय २२) (सर्व रा.माळहिवरा, ता.दिग्रस, जिल्हा यवतमाळ) बाबू भगवान लांडगे (वय ६९) उस्मानाबाद हे जखमी झाले आहेत. 

जखमींना तातडीने उपचारासाठी नांदेडला हलविले 
या अपघाताची माहिती मिळताच बाळापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास थोरात, उपनिरीक्षक हनुमंत नखाते पाटील, जमादार नागोराव बाबळे, राजेश मुलगीर, प्रभाकर भोंग, शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. हे पोलिसांनी बस व ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

रस्‍त्‍यावरील खड्ड्यामुळे होताहेत अपघात
हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्‍त्‍यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच हा रस्‍ता कामठाफाटा साळवा येथे अरुंद झाला आहे. येथे साईड पट्ट्याचे काम करणे गरजचे झाले आहे. वळण मार्गावर नेहमी वाहने पलटी होत आहे. बाळापूर ते कांडलीफाटा या मार्गावर बाळापूर शहरालगत असलेल्या एका वळण रस्‍त्‍यावर बिजगुणन केंद्राजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे आतापर्यंत तीन ते चार वाहने पलटी झाली आहेत. 

वळण रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे जड वाहनांना धोकादायक
या बाबत स्‍थानिक लोकप्रतिनिधीने आवाज उठवून संबधितांना वेळोवेळी निवेदन देखील दिले आहे. मात्र, त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. हा राष्‍ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. या मार्गाने जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वळण रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे जड वाहनांना धोकादायक ठरत असल्याने वाहनांचे अपघात होत आहे. यामुळे संबधित विभागाने या प्रकाराकडे लक्ष देवून रस्‍त्‍यावरील खड्डे व काही ठिकाणाच्या साईड पट्टयाची कामे करणे गरजेचे झाले आहे. तसेच या रस्‍त्‍यावर काही ठिकाणी गतिरोधक देखील बसविणे आवश्यक झाले आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे देखील अपघात होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com