Shock in Ration Distribution Set of Seven to Eight Teeth Found in Rice
sakal
जेवळी - रेशन दुकानातून पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी येत असताना, जेवळी (ता. लोहारा) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका रेशन ग्राहकाला मिळालेल्या तांदळात चक्क सात ते आठ दातांची कवळी (संच) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे रेशन धारकांमधून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.