...या जिल्ह्यात चौतीस हजार वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’

vij photo
vij photo

हिंगोली: जिल्‍ह्यात चौतीस हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा लवकरच खंडित केला जाणार असून त्‍यासाठी स्‍वतंत्र पथके स्‍थापन करण्यात आली आहेत. वारंवार सूचना देऊनही वीज बिल भरणा करण्याकडे दुर्लक्ष केल जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
जिल्‍ह्यात वीज कंपनीचे सुमारे एक लाख दहा हजार वीज ग्राहक असून यामध्ये औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांकडून नियमितपणे वीज देयक भरणे अपेक्षित असताना अनेकवेळा या ग्राहकांकडून वारंवार सूचना देवूनही वीज देयक भरले जात नाहीत. त्‍यामुळे चालू देयक व थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन वीज देयक भरणा करण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले होते. त्‍यानंतर वीज देयकाची वाढीव थकबाकी असलेल्‍या गावात फिरते वीज देयक भरणा केंद्र सुरु करण्यात आले होते. ग्रामीण भागातून वाहनाद्वारे फेरी मारून ग्राहकांकडून गावपातळीवरच वीज देयक भरून घेतले जावू लागले होते. मात्र त्‍यानंतरही जिल्‍ह्यातील अनेक ग्राहकांकडून वीज देयक भरण्यास टाळाटाळ केली जावू लागली आहे. त्‍यानंतर आता थकबाकीदार वीज ग्राहकांना वीज कंपनीने भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले आहेत. या ग्राहकांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या ग्राहकांनी मुदतीत चालू देयक व थकबाकी न भरल्‍यामुळे त्‍यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चौतीस हजार ३०५ वीज ग्राहक असून त्‍यांच्‍याकडे बारा कोटी अठरा लाख रुपयांची थकबाकी आहे. पुढील दोन दिवसात वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु होणार आहे. यामध्ये औंढा तालुक्‍यातील पाच हजार २९७, वसमत तालुक्‍यातील सात हजार १४१, हिंगोली तालुक्‍यातील सात हजार ५१, कळमनुरी तालुक्‍यातील आठ हजार ७१, सेनगाव तालुक्‍यातील सहा हजार ७४५ वीज ग्राहकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे वीज ग्राहकांना शॉक बसणार असल्याचे बोलले जात आहे. 


जिल्‍ह्यात चालू देयक व थकबाकी वसुलीसाठी वीज ग्राहकांच्‍या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले आहेत. मात्र मुदतीत चौतीस हजार ३०५ ग्राहकांनी देयकांचा भरणा केला नाही. त्‍यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. ग्राहकांनी तातडीने वीज देयक भरून कटू कारवाई टाळावी.
-सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com