Phulambri News : बनावट एन.ए.चा दीडशे प्लॉट धारकांना धक्का...!

आयुष्याची पुंजी जमा करून घेतला होता प्लॉट.
plot
plotsakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री शहरात 2018- 19 मध्ये खरेदी केलेला एन.ए लेआउट हा बनवट असल्याचे लक्षात येत आल्याने सुमारे दीडशे प्लॉट धारकांना मोठा धक्का बसला आहे. आयुष्याची जमापुंजी या प्लॉटमध्ये प्लॉट धारकांनी लावून प्लॉट खरेदी केला होता. परंतु सदरील एन.ए बनावट असल्याने मोठी फसवणूक झाल्याची भावना प्लॉट धारक व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे आता न्याय मिळणार कसा.? असा प्रश्न प्लॉट धारकासमोर उभा राहिला आहे.

फुलंब्री शहरातील सिल्लोड रस्त्यावर गट नंबर 17 मध्ये गटाची फोड करून 17/1 तयार करण्यात आला. त्यांनतर 17,872 चौरस मीटर अकृषिक निवासी क्षेत्र, खुली जागा 2,360 तर प्लॉट अंतर्गत रस्त्यासाठी 336 चौरस मीटर अकृषिकची नोंद सातबारावर घेण्यात आली होती.

सदरील एन.ए. हा 2014 पासून त्याचा फेर 2017 मध्ये घेण्यात आला. आणि 2017 - 2018 आणि 2019 या कालावधीत मोठ्या प्रमाणात येथील प्लॉट विक्री करण्यात आले. विक्री करीत असताना याच कालावधीत सिल्लोड रस्त्यावरील मुख्य महामार्गावरच मोठमोठाले होल्डिंगसह उपविभागीय अधिकारी यांचा एन.ए आणि लेआउटचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

त्यामुळे प्लॉट घेणाऱ्या लाभार्थ्यांनी पहिला सातबारा काढून सातबाऱ्यावर अकृषीक क्षेत्राची नोंद तपासली आहे. त्यानंतर संबंधित बिल्डर आणि डेव्हलपर यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांची नक्कल पाहिली. त्यानुसारच सुमारे दीडशे प्लॉट धारकांनी येथे प्लॉट खरेदी केले. या लेआउट मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी संख्या आहे.

तालुक्यातील शहराच्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक केली होती. सदरील गुंतवणूक करीत असताना पैसे नसल्याने अनेक प्लॉट धारकांनी गावाकडे जमीन विकून, घरातील महिलांचे दागिने मोडून, तर काहींनी खाजगी बँकांचे कर्ज काढून हा प्लॉट खरेदी केला होता. परंतु आता याचा एन.ए लेआऊटच बोगस असल्याने प्लॉट धारकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता हे प्लॉट धारक न्याय मागत आहे.

आठशे ते दोन हजार रुपये फुटा प्रमाणे प्लॉटची खरेदी -

800 पासून तर अकराशे रुपये फुटाप्रमाणे येथील प्लॉट धारकांनी प्लॉट खरेदी केलेला आहे. त्यामुळे प्लॉटच्या साईजनुसार सहा लाखापासून ते वीस लाखापर्यंत येथे प्लॉट सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेला आहे. सिल्लोड रोडवर असणारे चार प्लॉट हे प्रत्येकी सुमारे पाच हजार स्क्वेअर फुट असल्याने प्रत्येक प्लॉट कोट्यावधी रुपयात विक्री करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्लॉट धारकांचे उपोषण सुरू -

फुलंब्री शहरातील गट नंबर 17 मध्ये बनावट एन.ए च्या आधारे प्लॉट विक्री करून प्लॉट धारकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्लॉट धारकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात संबंधित बिल्डर, डेव्हलपर आणि खोटी सातबारा नोंद घेणारे तात्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी प्लॉट धारक योगेश पाथ्रीकर यांच्यासह उपोषणकर्त्यांनी केली आहे.

शहरातील गट नंबर 17 मध्ये बोगस एन.ए प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्लॉट धारक उपोषणाला बसले आहे. या संदर्भात पोलीस विभागाशी पत्र - व्यवहार केला असून या प्रकरणाची चौकशी करून पोलीस पुढील योग्य ती कारवाई करेल.

- संजीव राऊत, प्रभारी तहसीलदार फुलंब्री

गट नंबर 17 मध्ये प्लॉट खरेदी केल्यानंतर वर्षभराने आम्ही नगरपंचायतीकडे बांधकाम परवानगीसाठी संचिका दाखल केली. परंतु तेथेच गेल्यावर समजले की नगररचना विभागाची याला मान्यता नाही. त्यामुळे मागील पाच वर्षापासून सदरील प्लॉट धारक त्रस्त आहे. आणि आता एका सहकार्याने एसडीएम कार्यालयातून एन.ए. ची नक्कल मागितली असता नोंदच नसल्याचे कळाले. त्यामुळे आमची प्लॉट धारकांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा.

- डॉ.दुर्गा तांदळे, प्लॉट धारक.

मागील गेल्या सहा-सात वर्षांपासून प्लॉट घेतलेले आहे. परंतु त्याची बांधकाम परमिशन मिळत नसल्याने सर्व प्लॉट धारक त्रस्त आहे. आता एन.ए बोगस असल्याची बाब समोर आली आहे. एन.ए बोगस असेल तर मग सातबारावर अकृषिकची नोंद कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई करून आम्हा प्लॉट धारकांना न्याय द्यावा.

- योगेश जाधव, प्लॉट धारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com