esakal | धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांचा आलेख वाढताच 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अँटीजन टेस्टमध्ये चार रुग्ण आढळले, दिवसेंदिवस आलेख वाढतोय.

धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांचा आलेख वाढताच 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी (ता. २४) रात्री प्राप्त अहवालानुसार २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये चार रुग्ण हे अँटीजन टेस्टमध्ये सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

कोरोना रुग्ण आढळून आलेल्यापैकी हिंगोली शहरातील पंचशीलनगर ६० वर्षीय एक पुरुष, मंगळवारा येथील दोन ६३, ५२ वर्षीय पुरुष, नवा मोंढा येथे दोन यात  ४९, २० वर्षीय पुरुष ,तालाब कट्टा येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गोलनदाज गल्ली येथील एका ३२ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील    एक २७ वर्षीय पुरुष, काझीपुरा येथील ५० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय आझम कॉलनी येथील तिघे जण असून यात २४ वर्षीय स्त्री, दोन वर्षांची मुलगी, चार महिन्याचा मुलगा यांचा समावेश आहे. तसेच जुने पोलीस ठाणे येथील ३०, ६० पुरुष तर २१ वर्षाच्या महिलेला लागण     झाली आहे. साहूनगर येथे चार, तर जिल्हा परिषद वसाहत दोन, एसआरपीएफ एक, आखाडा बाळापूर तीन, स्त्री रुग्णालय क्वार्टर वसमत येथे एका २३ वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.

हेही वाचा - नांदेडला थोडासा दिलासा : शुक्रवारी ४३ रुग्ण बरे तर ३९ बाधित, संख्या ११६९ वर पोहचली

आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ५३३ रुग्ण आढळून आले

आज रोजी २० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये लिंबाळा व वसमत येथील सेंटर येथील रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ५३३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३५४  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत. आजघडीला एकूण     १७४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

६२३४ जणांना सुट्टी देण्यात आली.

जिल्हातंर्गत आयसोलेशन वॉर्ड सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार कारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ७०२६ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ६१७८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.६२३४ जणांना सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला  ८५५ रुग्ण भरती असून, आजरोजी ३६० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या पैकी १३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजन सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top