केज - अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी नववधू माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार सोमवारी (ता.१२) उघडकीस आला आहे. तालुक्यात नऊ मे रोजी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास नातेवाईक व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित राहुन नववधूवरांना भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मात्र यावेळी नववधूच्या मनात वेगळेच काहीतरी सुरू असल्याची पुसटशी उपस्थित कोणालाही कल्पना नव्हती. या घटनेने त्या गावातील ग्रामस्थात एकच खळबळ उडाली आहे.