Beed Crime : दारूच्या नशेत बापानेच घेतला मुलाचा जीव! माजलगाव तालुक्यातील थरारक घटना
Crime News : माजलगाव तालुक्यात खानापूर गावात रविवारी दुपारी दारूच्या नशेत बापाने कुऱ्हाडीचा दांडा मारून मुलाचा खून केला. पोलिसांनी संशयित पित्याला अटक केली आहे.
माजलगाव : दारूच्या नशेत बापाने डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून मुलाचा खून केल्याची घटना माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खानापूर गावात रविवारी (ता. चार) दुपारी घडली.