
पाथरी (जि. परभणी) : धावत्या खासगी बसमध्ये प्रसूतीनंतर खिडकीतून अर्भक फेकून दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी जन्मदात्रीसह तिच्या साथीदारावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. महिलेवर उपचार सुरू असून तिच्या सोबत असलेल्यास पोलिसांनी अटक केली आहे.