Naigaon Murder Case
Naigaon Murder Case sakal

Naigaon Murder Case : पत्नीला पाठवत नसल्याच्या रागात; जावयाने सासूचा धारधार शस्त्राने कापला गळा

Naigaon Murder Case : नरसी येथे पत्नीच्या माहेरी गेल्यानंतर झालेल्या वादात जावयाने सासूचा गळा चिरून खून केला. या धक्कादायक घटनेत खुनी जावयासह एकाला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published on

नायगाव : पतीच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी आली होती. माहेरी आलेल्या पत्नीला का पाठवत नाहीस असा वाद घालून जावयाने घरासमोर बसलेल्या सासूचा चक्क गळा चिरुन खुन केल्याची खळबळजनक घटना (ता.११) रोजी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान नरसी येथे घडली. खुनी जावयासह अन्य एकाला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरच्या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी नरसी येथे भेट दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com