
पाचोड : खरिपात पेरलेल्या बियाण्याची तुट लागवडीसाठी शेतावर गेलेल्या एकट्या महीलेस पाहून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चाकूचा धाक दाखवून, हातपाय बांधून तिच्या अंगावरील सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना पाचोड खुर्द (ता.पैठण) शिवारात सोमवारी (ता.१६) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली.