

हयात प्रमाणपत्रासाठी गेलेल्या ९ वृद्धांचा काळाशी झुंज! पैठणजवळ रिक्षा उलटून भीषण अपघात; दलालांच्या जाचातून 'निराधार' लाभार्थी संकटात
Sakal
ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव: पैठण तहसील कार्यालया मार्फत श्रावण बाळ वृध्द योजना,संजय गांधी निराधार योजना लाभ सुरू ठेवण्यासाठी ह्यात प्रमाणपञ सादर केल्यावर अपेरिक्षातुन ढाकेफळ गावाकडे परतीच्या प्रवासात निघालेल्या वृध्द लाभार्थीची भरधाव रिक्षाच्या चाकाची बेरींग खराब झाल्याने ७४ जळगाव ते बोरगांव रोडवर अपघात होऊन ९ जण जखमी झाले. हि घटना शनिवार (ता.१८) दुपारून घडली आहे.