
छत्रपती संभाजीनगर : श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंग मंदिरे भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली. ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ, औंढ्यातील नागनाथ आणि वेरूळ येथील घृष्णेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.