Parli Vaijnath Temple : वैद्यनाथाचे मंदिर सजले! शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तगडा बंदोबस्त
CCTV Cameras Installed in Parli Temple : श्रावण सोमवारी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. मंदिरात सुरक्षेची आणि व्यवस्था जय्यत आहे. मराठवाड्यात दमदार पावसानं नदी-ओढे आणि प्रकल्प भरून निघालेत.
परळी वैजनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या स्वागतासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.