

Divine Celebration: Shri Krishna Janmotsav Observed with Fervor at Devgad
Sakal
कायगाव : श्री गुरुदेव दत्त पीठ श्रीक्षेत्र देवगड संस्थान (ता. नेवासा) येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव रविवारी (ता.२४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खचाखच भरलेल्या सभागृहात फुलांची उधळण करीत, माता-भगिनींच्या लक्षणीय उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.