सत्ता दुरावल्यामुळेच भाजपची अस्वस्थता वाढली : श्रीकांत शिंदे | Shrikant Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Shinde

सत्ता दुरावल्यामुळेच भाजपची अस्वस्थता वाढली : श्रीकांत शिंदे

परभणी : सत्तेपासून दूर गेल्याने भाजपचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची अस्वस्थता त्यांच्या वागण्यातून दिसून येते. महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना टार्गेट करुन ईडीसारख्या यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी गुरुवारी (ता.२४) केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध तालुके व जिल्हा परिषद गटांतील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजुन घेण्यासाठी खासदार शिंदे हे परभणी दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी परभणी (Parbhani) शहरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. (Shrikant Shinde Says, BJP Feel Unwell Due To Power)

हेही वाचा: श्रीलंकेत अन्न व पाण्यासाठी मारामारी ! दोन हजार रुपयाला १ लिटर दूध मिळतयं

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, विष्णू बोराडे, अंबिका डहाळे, विधानसभा प्रमुख तथा उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. खासदार शिंदे म्हणाले, गेल्या तीन दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यातील विविध तालुके आणि विभागांना भेटी देत तेथील शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची लवकरच भेट घेऊन जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

हेही वाचा: मुलीचा मृतदेह पाहाताच आईने फोडला हंबरडा; दोन महिलांचा...

आपले सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्या दृष्टीने जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन विविध योजनांंच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Shrikant Shinde Says Bjp Feel Unwell Due To Power

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top