नांदेडमधील ‘ही’ सामाजिक संस्था जपतेय मानवी मूल्य, कोणती? ते वाचायलाच पाहिजे  

File photo
File photo

नांदेड : समाजाला आज शाश्‍वत विकास घडवून व्यक्तीचे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे ही आव्हाने आहेत. ही आव्हाने स्वीकारून ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांवर काम करण्यासाठी शुभंकरोती फाउंडेशन ही सामाजिक संस्था समाजाशी नातं ठेवून, कायम बांधिल राहून मानवी मूल्य जपण्याचे कार्य करीत आहे. 

समाज परिवर्तनासाठी विविध उपक्रम
मराठवाडा, विदर्भातील सामाजिक व आर्थिक मागास परिसरातील महिला व मुलींना समान हक्क, शिक्षण, आरोग्य, प्राबल्य मिळावे, या भागांमध्ये कल्याणकारी उपक्रम राबवून लोकहितार्थ काम करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये शुभंकरोती फाउंडेशनची स्थापना झाली. फाउंडेशनच्या माध्यमातून थेट फिल्डवर काम करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी सर्व सदस्य हे वैचारिकदृष्ट्या परिपक्व असलेले ३० ते ४० वयोगटातील युवक-युवती आहेत.   सद्यःस्थितीत संस्थेचे ३५ सदस्य असून पारंपरिक समाजकार्याला छेद देऊन व्यक्तीच्या जीवनात थेट बदल घडविण्यासाठी, तसेच समाजपरिवर्तनासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत. 

मानवी मूल्यही जपण्याचा प्रयत्न
महिला व मुलींच्या आरोग्याबाबत कार्य करणाऱ्या संस्थांपैकी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करणारी नांदेड जिल्ह्यातील शुभंकरोती फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे. एवढेच नाही तर वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ व महाराष्ट्र अध्यादेश २०१३ या अंतर्गत तत्काळ मोफत मार्गदर्शन, मदत केंद्र सुरु करणारीही मराठवाड्यातील पहिली संस्था आहे. अवयवदान मोहिमेला पुढे घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व स्तरांवर मदत करण्याचे कार्यदेखील ही संस्था करते. समाजाने नाकारलेल्या कच्च्या कैद्यांनी पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर जाऊ नये, यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ते आत्मनिर्भर होण्यासाठी संगणक साक्षरता केंद्र सुरु करून मानवी मूल्य जपण्याचे कामही शुभंकरोती फाऊंडेशन करीत आहे.   

मराठवाड्याबाहेरही कार्य 
वैचारिकदृष्ट्या परिपक्व असलेल्या युवक-युवतींनी एकत्र^येऊन स्थापन केलेल्या शुभंकरोती फाउंडेशनचा प्रवास सद्यस्थितीत मराठवाड्याच्या बाहेरही पोचला आहे. समानता, बंधुत्व आणि कल्याण या मूलभूत जीवनमूल्यांवर आधारित सुरु केलेल्या संस्थेच्या उपक्रमांची व्याप्ती आता वाढत चालली आहे. स्त्री-पुरुष समानता, आरोग्य, व्यक्ती, नातेसंबंध यासारख्या इतरही सामाजिक विषयांवर शुभंकरोती फाउंडेशन काम करीत आहे. 

हे देखील वाचाच अंगणातील चिवचिवाट होतोय दुर्मिळ
 
संस्थेची ठळ्ळक वैशिष्ट्ये

  • आई-वडिल व ज्येष्ठ नागरिकांसाठी समुपदेशन केंद्र 
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे 
  • किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक अत्याचार विषयावर समुपदेशन कार्यशाळा 
  • मासिक पाळीचे नियोजन, आहार व स्वच्छतेबाबत नियमित मार्गदर्शन शिबिरे 
  • स्त्री-पुरुष समानता, पितृसत्ता, पुरुषत्व याबाबत सामाजिक उपक्रम 
  • महिला व मुलीच्या आरोग्यासाठी ‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती प्रकल्प 
  • स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या मागणीबाबत सक्रिय सहभाग 
  • निराधार व निराश्रीत मुलांना शैक्षणिक व आरोग्यविषयक मदत. 

संस्थेचा आजवर झालेला सन्मान 

  1. महाराष्ट्र शासनाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ 
  2. अवयवदान जनजागृतीसाठी शासनातर्फे विशेष सन्मान 
  3. थायलंड येथील आशियायी सुरक्षित गर्भपात परिषदेसाठी निवड 
  4. नेपाळ येथील सार्क आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेसाठी निवड 
  5. किशोरवयीन मुलींच्या समुपदेशन कार्यशाळेची पुणे महापालिकेकडून दखल 
  6. पाणी फाउंडेशनतर्फे विशेष सन्मान 

का आहे ‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती प्रकल्प

  • शालेय व महाविद्यालयीन मुलींना किशोरी दत्तक योजनेंतर्गत मोफत सॅनेटरी पॅड 
  • यूव्ही स्टरलाईझ पॅडमुळे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम नाही 
  • आरोग्यासाठी अपायकारक केमिकल, कलर व पदार्थ यांचा समावेश नाही 
  • सर्वप्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित 
  • इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड 
  • मल्टी नॅशनल ब्रॅंड कंपनीच्या पॅडच्या तुलनेचे सॅनिटरी पॅड 

‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ 
मासिक पाळी हा जरी नैसर्गिक संक्रमणाचा काळ असला तरी त्या काळातील स्वच्छता, पोषक आहार आणि आरोग्यविषयी घ्यावयाच्या काळजीचा अभाव आजही समाजात आहे. शालेय शिक्षण पद्धतीत अंतर्भूत नसलेल्या आणि लज्जेची बाब समजून उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक बाबीला उघडपणे बोलणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर सातत्त्याने मराठवाड्यात काम करत असलेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. महिला व मुलींच्या आरोग्यासाठी पूरक अशा उच्च दर्जाच्या सॅनिटरी पॅडचा निर्मिती प्रकल्प शुभंकरोती फाऊंडेशन तर्फे उभारला आहे. 

स्वच्छतेसोबतच स्वयंरोजगारही
पारंपरिक समाजकार्याला छेद देऊन थेट व्यक्तींच्या जीवनात बदल घडविण्याचे निःस्वार्थी कार्य शुभंकरोती फाउंडेशनतर्फे सुरु आहे. संस्थेचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्प’.  या प्रकल्पामुळे महिलांना स्वच्छतेसोबतच स्वयंरोजगारही उपलब्ध झाला आहे. 
- किरण चौधरी (अध्यक्ष, शुभंकरोती फाउंडेशन)   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com