बहिण-भाऊ करताहेत  मतदानाची जनजागृती 

राजेभाऊ मोगल
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणूक कुठलीही असू द्या, औरंगाबादचे लोकेश बनसोडे व हर्षा बनसोडे या बहिण-भावंडाची मतदार जनजागृती हे जणू समीकरणच झालेले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाला की, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून ही भावंडे जनजागृती करत असतात.

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणूक कुठलीही असू द्या, औरंगाबादचे लोकेश बनसोडे व हर्षा बनसोडे या बहिण-भावंडाची मतदार जनजागृती हे जणू समीकरणच झालेले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाला की, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून ही भावंडे जनजागृती करत असतात. 

न्यू नंदनवन कॉलनी येथील लोकेश व हर्षा बनसोडे ही भावंडे घोषवाक्‍यांच्या माध्यमातून आपल्या सायकलवर घोषवाक्‍यांचे फलक लावून संपूर्ण परिसरात सायकल फेरीद्वारे मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगत आहेत. ""वृद्ध असो की असो जवान, सर्वजण करा अवश्‍य मतदान'' तसेच ""आपली जबाबदारी व अधिकार, मजबूत लोकशाहीचा आधार'' अशा प्रकारच्या उद्‌बोधक घोषवाक्‍याच्या माध्यमातून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

लोकसभेच्या निवडणूकीमध्येही या भावंडांनी मतदार जनजागृती केली होती व विशेष म्हणजे, न्यू नंदनवन कॉलनीमध्ये त्यावेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली होती. या वेळेसही मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्‍वास लोकेश व हर्षा बनसोडे यांना व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siblings are doing Awareness of voting