
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल हरवला किंवा चोरीस गेल्यास तो परत मिळण्याची शक्यता जवळपास मोबाईलधारक कमीच गृहीत धरतो. मात्र, सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने उत्कृष्ट तपास करीत सात लाखांचे ३५ मोबाइल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले. यामुळे मोबाइलधारकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.