हिंगोली जिल्ह्यात सिध्देश्वर कोविड सेंटर रुग्णासाठी ठरतेय वरदान

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथे डीसीएच सिध्देश्वर येथे कोविड सेंटरमध्ये हिंगोली व परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. या केंद्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे
औंढा कोविड सेंटर
औंढा कोविड सेंटर
Updated on

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर (Aundha covid center) येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कोविड सेंटर रुग्णासाठी वरदान ठरत असून येथे हिंगोली जिल्ह्यासह परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी (covid pationt) दाखल होत आहेत. आतापर्यंत १९० पैकी १४० रुग्ण उपचारातुन बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. Siddheshwar Kovid Center in Hingoli district is a boon for patients

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथे डीसीएच सिध्देश्वर येथे कोविड सेंटरमध्ये हिंगोली व परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. या केंद्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर मृत्यू दर कमी आहे. आतापर्यंत येथे १९० रुग्णांपैकी १४० रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ३८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथे बारा रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व नागरिकांसाठी 100 बेडचे मोफत कोवीड सेंटर उभारण्यात येत आहे.

येथे रुग्णासाठी सोयीसुविधा योग्य मिळत आहेत. स्वच्छता, आँक्सीजन बेड, भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकाचा कल येथे आहे.दरम्यान, शनिवारी ता. आठ वसमत तालुक्यातील जोडपरळी येथील दशरथे परिवारातील एकाच कुटुंबातील पाच कोरोना रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. हे सर्व रुग्ण पाच वर्षावरील असल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत असताना सिध्देश्वर येथील कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार मिळाल्याने समाधानी झाले आहेत.

या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सचिन बर्गे काम पाहत आहेत. ते येथे चोवीस तास रुग्णाच्या सेवेत असतात. तसेच डॉ. धामणे, डॉ. राऊत, व तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी बारा, बारा तासाच्या शिफ्ट मध्ये काम करीत आहेत. अधिपरिचारक श्री. किरवले, इंगोले, सफाई कर्मचारी श्री. राठोड, श्री. चव्हाण, श्री. टापरे काम करीत आहेत. या सर्वांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, तहसीलदार कृष्णा कानगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com