पैठण - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पाणी पातळीने ४० टक्के पातळीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या पाच दिवसात धरणात १२ टक्के पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणाचा शुक्रवारी (ता. २७) ४०.२२ इतका झाला आहे. अशी माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी शुक्रवारी (ता. २७) दिली.