

Jalna News
esakal
भोकरद: सिल्लोड-भोकरदन या १५ किलोमीटरच्या मुख्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी चार वर्षांपूर्वी शेकडो वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, चिंच, उंबर यांसारख्या देशी व डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊनही दुतर्फा नव्याने वृक्षलागवड करण्यात आली नसल्याने संपूर्ण मार्ग भकास आणि उघडा पडला आहे. कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षलागवडीची जबाबदारी झटकली काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.