Beed: सीना धरण यंदा खपाटीला, मागील वर्षी जूनलाच झालेलं ओव्हर-फ्लो; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

Sina Dam Faces Severe Water Shortage: गेल्या वर्षी जूनमध्ये ओव्हरफ्लो झालेले धरण यंदा कोरडे असल्याने शेतकरी आणि जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

नीलेश दिवटे

कर्जत: कर्जतसह आष्टी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या सीना धरणाचे पोट खपाटीला गेले आहे. केवळ मृतसाठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वांत प्रथम आजच्याच दिवशी म्हणजे १४ जूनला स्थापनेपासून प्रथमच भरण्याचा मान मिळविलेले हे धरण यंदा कोरडेठाक असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com