

Beed News
esakal
सिरसाळा: महिन्यातून एकदा नळाला पाणी येतं, तेही इतकं घाण की प्यावं का फेकून द्यावं, हेच कळत नाही. अहो, रोजगाराला जायचं सोडून दिवसभर पाणी भरत बसायचं का? आम्ही दररोज जारचं विकतचं पाणी घेऊ शकत नाही, ही आर्त हाक आहे सिरसाळ्यातील गृहिणी लक्ष्मीबाई कुंभार यांची. ही व्यथा केवळ त्यांची एकटीची नाही, तर परळी वैजनाथ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि १८ हजार लोकसंख्या असलेल्या संपूर्ण सिरसाळा गावची आहे. सत्ताकेंद्राच्या जवळ असूनही, येथील जनतेच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई आणि लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने यामुळे गावचा श्वास गुदमरतोय.