भावाच्या निधनाचे दु:ख अनावर झाल्याने बहिणीने सोडले प्राण | Parbhani Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani Live News

भावाच्या निधनाचे दु:ख अनावर झाल्याने बहिणीने सोडले प्राण

पूर्णा (जि.परभणी) : येथील सुनील नारायण जैस्वाल यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या त्यांच्या बहीणीला दु:ख अनावर झाल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही मन हेलवून टाकणारी दुर्दैवी घटना पूर्णेत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. वेड्या बहिणीची वेडी माया असते. हे आपण गीत ऐकलेले आहे. तसे बहीण भावाचे हे तरळ नाते भारतीय संस्कृतीत श्रेष्ठ मानल्या व अनुभवल्या जाते. त्याचा प्रत्यय पूर्णेत (Purna) आला. येथील व्यापारी असलेले सुनील नारायण जैस्वाल (वय ६२ ) यांचे रविवारी (ता.२९ ) अल्पशा आजाराने निधी झाले. (Sister Died After Her Brother Demise In Purna Of Parbhani)

हेही वाचा: धक्कादायक! सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा तळ्यात बुडून मृत्यू

भावाचे निधन झाल्याचे समजताच त्यांची मोठी बहीण सुनीता विजय जैस्वाल (वय ६५ ) या औरंगाबाद (Aurangabad) येथून अंत्यविधीसाठी आल्या. सकाळी अकरा वाजता सुनील यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतांना त्यांना दु:ख अनावर होऊन हृदयविकाराचा (Heart Attack) तिव्र धक्का बसला अन् त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील यांच्यावर सोमवारी (ता.३० ) सकाळी साडेअकरा वाजता, तर सुनीता यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: MPSC | सहायक कक्ष अधिकारी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील जैस्वाल यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले ,सून असा परिवार आहे. सुनिता जैस्वाल या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Sister Died After Her Brother Demise In Purna Of Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top