
शुक्रवारी (ता. २२) पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. परंतू उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांनी लेखी अश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर या भागातील रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याची कामे तातडीने हाती घेण्यासाठी या भागातील युवकांनी शुक्रवारी (ता. २२) पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. परंतू उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांनी लेखी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील नागसेननगर कमलानगर साईनगर, डॉ. आंबेडकरनगर आदी भागातील रस्त्याची बकाल अवस्था झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे कामे केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. यापूर्वी देखील रस्त्याची कामे हाती घेण्यासाठी पालिकेला निवेदन देण्यात आले होते. परंतू पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या भागातील युवकांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
हेही वाचा - धक्कादायक : पत्नीचा जाळुन खून करणाऱ्या पतीवर गुन्हा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना
त्यानुसार या परिसतील शहरातील इतर भागात रस्ते तयार केले जात आहेत, त्याच धर्तीवर या भागात रस्ते तयार करून देण्यात यावेत अशी मागणी केली होती.मात्र वेळोवेळी पालिकेने दुर्लक्ष केल्याने आज नागरिकांनी संताप व्यक्त करीत लोकराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कळासरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले.या ठिय्या आंदोलनात शेकडो युवक सहभागी झाले होते. त्यानंतर पालिकेने रस्त्याची कामे हाती घेतली जातील असे लेखी अश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेतले.
संपादन - प्रल्हाद कांबळे