Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Historical Importance of Dharur Fort and Surroundings: किल्ले धारूर येथील ‘सीतेची न्हाणी’ आणि इतर ऐतिहासिक स्थळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत जात आहेत.नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आणि समृद्ध वारसा असूनही विकासाअभावी पर्यटनाला मोठा फटका बसत आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

किल्ले धारूर: बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये वसलेले धारूर शहर म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि पराक्रमाचा एक अद्भूत संगम. मात्र, याच डोंगरदऱ्यात दडलेला आपला अमूल्य वारसा आज काळाच्या ओघात हरवत चालला की काय, अशी भीती वाटू लागली आहे. शहराच्या उत्तरेला गोपाळपूर मार्गावर वसलेले ‘सीतेची न्हाणी’ हे पौराणिक स्थळ आज प्रशासकीय दुर्लक्षामुळे ओसाड होत असून, येथील ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जात आहेत. वनवासात असताना माता सीतेने ज्या ठिकाणी स्नान केले, अशी धारणा असलेले हे स्थळ आणि येथील बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा आज जतन आणि संवर्धनासाठी साद घालत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com