बीड जिल्ह्यात खूनप्रकरणी सहाजण अटकेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गेवराई (जि. बीड) - नागझरी (ता. गेवराई) येथील संजय काकासाहेब चव्हाण या तरुणाच्या खून प्रकरणात शनिवारी (ता. 14) रात्री उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात 18 जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता बुधवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींत निवृत्त सहायक फौजदार रमेश गायकवाड, रोहिणी चव्हाण, सरस्वती चव्हाण, संगीता चव्हाण, सीमा पवार, विश्वास चव्हाण यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 


चार एप्रिल 2019 रोजी नागझरी येथे उत्तरेश्वर भारत चव्हाण (वय 21) या तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा नोंद झाला होता. यात आरोपी असलेल्या काक्‍या ऊर्फ काकासाहेब चव्हाण याचा मुलगा संजय (वय 20) याच्यावर शनिवारी धारदार शस्त्राने वार करण्यात आले. जखमी संजयला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मालन काकासाहेब चव्हाण हिच्या फिर्यादीवरून 18 जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला.

नारायण पवार, पप्पू पवार, रोहिणी चव्हाण, आगलाव्या भारत पवार, गोट्या आगलाव्या पवार, सरस्वती पवार, जावेद चव्हाण, शहादेव चव्हाण, संगीता चव्हाण, शिवकन्या पवार, सीमा पवार, देवगण चव्हाण, सोनी जावेद चव्हाण, चाईना शहादेव चव्हाण, छप्पन चव्हाण, विश्वास चव्हाण, नागनाथ काळे, रमेश गायकवाड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यापैकी निवृत्त सहायक फौजदार रमेश गायकवाड, रोहिणी चव्हाण, सरस्वती चव्हाण, संगीता चव्हाण, सीमा पवार, विश्वास चव्हाण या सहाजणांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने बीडजवळील बांगरनाला व नागझरी परिसरातून अटक केली. त्यांना रविवारी (ता. 15) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com