देगलूर - देगलूर नगर परिषदेच्या येत्या ता. २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार ता. २१ रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी थेट नगराध्यक्ष पदासाठी पाच जण निवडणूक रिंगणात आहेत..तर नगरसेवक पदासाठी शुक्रवारी ता. २१ रोजी ११ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता २७ सदस्यांसाठी १०२ जण निवडणूक आखाड्यात उरले आहेत. त्यात १२ (क) मधून वंचित बहुजन आघाडीच्या इंगोले नीतू उत्तम यांनी आपला अर्ज मागे घेतला तर प्रभाग ४ (अ) मधून शिवसेनेचे विजय बकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला..थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून मनोरमा निलमवार, राष्ट्रवादीकडून विजयमाला टेकाळे यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता असून भाजपाच्या नीलाताई भांगे हे मतदारापर्यंत कितपत 'अप्रोच' होतात यावर त्यांचे भविष्य अवलंबून असणार आहे. शिवसेनेकडून जयश्री काब्दे तर कुरेशी मुस्कान मोहम्मद याही आपले नशीब आजमावणयासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत..'सहा' कुटुंबाभोवतीच देगलूर ची निवडणूक...!जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या व जिल्ह्यात 'ब' वर्गाची नगरपरिषद असलेल्या देगलूर नगरपरिषदेला राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. या पालिकेचे आजपर्यंत अनेक दिगगजांनी नेतृत्व केलेले आहे.समाजवादी विचारसरणी मानणाऱ्या येथील मतदारांना विकासाच्या बाजूने मतदान करावेसे वाटत असले तरी पक्षीय, जातीय, धर्मीय, राजकारणामुळे ते आजपर्यंत साध्य करता आलेले नाही. त्यामुळे देगलूर शहर व परिसराचा मनावा तसा विकास झालेला नसल्याचे दृष्टिक्षेपास येते..सहा कुटुंबेच निवडणुकीचे केंद्रबिंदू...देगलूर चे माजी दिवंगत नगराध्यक्ष मष्णाजीराव निलमवार यांच्या कुटुंबातील तीन जण या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या पत्नी मनोरमा निलमवार हया काँग्रेसकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर पुत्र माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार हे प्रभाग १ (अ) मधून रिंगणात आहेत..तर त्यांच्या पत्नी प्रभाग ११ (ब) मधून स्वाती अविनाश निलमवार या आपले नशीब आजमावत आहेत. माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार हे प्रभाग १० (ब) मधून तर त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा उज्वला पदमवार या प्रभाग ११( ब )मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव रोयलावार हे प्रभाग १० (ब) मधून रिंगणात असून येथे त्यांचे पूर्वाश्रमीचे जिगरी मित्र लक्ष्मीकांत पदमवार यांच्याशी त्यांची 'काट्यांची लढत' होत आहे..बालाजी रोयलावार यांचे पुतणे चैतन्य व्यंकट रोयलावार हे प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून निवडणूक रिंगणात आहेत. माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे यांच्या पत्नी विजयमाला टेकाळे हया राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. तर त्यांचे चुलत बंधू एकनाथ टेकाळे हे ९ (ब) मधून निवडणूक रिंगणात आहेत..तर माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार हे प्रभाग ६ (अ) मधून तर त्यांच्या पत्नी सुरेखा शिरसेटवार ह्या प्रभाग ५ (अ) मधून निवडणूक रिंगणात आहेत. माजी नगरसेवक अशोक गंदपवार प्रभाग १३ (ब) मधून तर त्यांचा सामना १३ (ब) मधूनच राष्ट्रवादीच्या साईकुमार गंदपवार यांच्याशी होत आहे. निलमवार, पदमवार, रोयलावार, टेकाळे, शिरसेटवार, गंदपवार या कुटुंबाभोवतीच ही निवडणूक केंद्रित झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.