esakal | सहा लाख २५ हजारांचा  अवैध वाळू साठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २६) पहाटे दीडच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून लिंबा येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या साठा केलेल्या वाळू साठ्यावर छापा मारला. त्या वेळी अवैधरीत्या विक्रीसाठी साठवलेली १२५ ब्रास वाळू आढळून आली. बाजार भावाप्रमाणे ज्याची किंमत सहा लाख २५ हजार एवढी आहे.

सहा लाख २५ हजारांचा  अवैध वाळू साठा जप्त

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी (जि.परभणी) : लिंबा (ता. पाथरी) येथील गोदावरी नदीपात्रात साठवून ठेवलेला १२५ ब्रास वाळू साठा पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता. २६) पहाटे अडीचच्या सुमारास छापा मारून पकडला. आता वाळू साठ्यासह वाहतुकीवर पोलिस विभागाकडून कारवाई होत असल्याने महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती राग सुधा यांना लिंबा येथील गोदापत्रात मोठ्या प्रमाणावर वाळू साठा केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पांचाळ, सहायक फौजदार हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, नारायण वानोळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २६) पहाटे दीडच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून लिंबा येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या साठा केलेल्या वाळू साठ्यावर छापा मारला. त्या वेळी अवैधरीत्या विक्रीसाठी साठवलेली १२५ ब्रास वाळू आढळून आली.


हेही वाचा व पहा : Video : विलासराव  देशमुख : तो राजहंस एक

जप्त वाळू साठा महसूल विभागाच्या ताब्यात

बाजार भावाप्रमाणे ज्याची किंमत सहा लाख २५ हजार एवढी आहे. घटनास्थळी पथक गेल्यानंतर या घटनेची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड व तहसीलदार एन. यू. कागणे यांना देण्यात आली. त्यानंतर हे अधिकारी इतर कर्मचाऱ्यांसह रात्री अडीच वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पथकाने पुढील कारवाईसाठी जप्त वाळू साठा महसूल विभागाच्या ताब्यात दिला.

मोठी कारवाई...
पाथरी तालुक्यातील लिंबा येथील गोदावरी नदीपात्रात सहा लाख रुपये किमतीचा वाळू साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे.