COVID-19 : बीडमध्ये आज सात नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

रुग्णसंख्या दिडशे पार; बीडमध्ये सर्वाधिक

बीड : जिल्ह्यात कोरोना मीटर सुरूच असून रविवारी (ता. पाच) नव्या सात रुग्णांची भर पडली. दरम्यान, एकाचा कोविड-१९ आणि इतर आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा दीडशे पार गेला आहे. बीड शहरात पुन्हा दोन रुग्ण आढळून शहराची व तालुक्याची कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या सर्वाधिक 54 झाली.

रविवारी जिल्हाभरातील विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरमधून 248 जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होतेे. याची तपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत झाली. यात सहा जणांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह 239 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तीन अनिर्णित राहिले. सहा नव्या रुग्णांत बीड शहरातील जुना बाजार येथील 38 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा कोरोनाबधित आढळला.

कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम सावधानतेचा इशारा चीनने नव्हे तर...

अंबाजोगाईतील संत कबीरनगर येथे 40 वर्षीय महिला कोरोनाबधित आढळून आली असून, सदर महिला अलिबागहून आलेली आहे. आष्टी तालुक्यातील सुरडी येथे मुंबईहून आलेली 30 वर्षीय महिला तसेच याच तालुक्यातील गंगादेवी येथे 65 वर्षीय पुरुष कोरोनाबधित आढळला.  परळी शहरातदेखील 58 वर्षीय पुरुषालाही बाधा झाली.

सातवा बळी
आष्टी तालुक्यातील गंगावाडी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा सायंकाळी मृत्यू झाला। तत्पूर्वी त्याचा स्वब नमुना तपासणीसाठी घेतला होता. रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला। यापूर्वी सहा जणांचा बळी गेला होता.
 

कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे

कोरोना मीटर

  • एकूण रुग्ण  १५६
  • उपचार घेत असलेले रुग्ण  ३४
  • बरे झालेले ११५
  • एकूण मृत्यू - ०७

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six new cases of COVID-19 in Beed District

Tags
टॉपिकस
Topic Tags: