Coronavirus : लातुरात सहा तर उदगीरमध्ये एक नवा रुग्ण

सुशांत सांगवे
शनिवार, 30 मे 2020

लातूर शहरात दिवसेंदिवस वाढतेय रुग्णसंख्या

लातूर : लातूर जिल्ह्यानंतर आता लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच 7 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची शनिवारी (ता. 30) भर पडली. यातील 6 रुग्ण हे लातूर शहरातील तर 1 रुग्ण उदगीरमधील आहे. दरम्यान, आज दिवसभरात उदगीर आणि अहमदपूर येथील प्रत्येकी 2, अशा 4 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे लातुर जिह्यात एकूण रुग्णसंख्या 137 झाली असून सध्या 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आजवर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईहून आलेल्या देसाई नगर येथील एका व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी (ता. 29) पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या कुटुंबातील 3 सदस्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय, शहरातील जिजामाता नगर (अंबाजोगाई रस्ता) येथील 50 वर्षे वय असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू आहेत.

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

लातुरातील स्त्री रुग्णालय येथील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 13 व्यक्तींचे निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर एका व्यक्तीच्या स्वॅब परिपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी होते. त्यापैकी 29 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि 3 व्यक्तीचे अहवाल अंतिम आले नाहीत, अशी माहिती संस्थेतील विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर आणि कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

लातूर : कोरोना मीटर

  • एकूण बाधीत : 137
  • बरे झालेले : 64
  • उपचार सुरू असलेले : 70
  • मृत्यू : 03

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six new patients in Latur