
मागच्या वर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाचशेच्यावर विहीर व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले होते. तर ७६ टँकरने विविध गावांत पाणीपुरवठा करण्यात आला होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात झालेल्या अवेळीच्या पावसाने भुर्गभातील पाणीपातळी वाढली. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईचा परिणाम कमी प्रमाणात जाणवला.
हिंगोली ः जिल्ह्यात नळ योजना दुरुस्तीची ३८ कामे तर तात्पुरती पुरक नळ योजनेची ७८ कामे मंजूर झाली होती. त्यापैकी तात्पुरत्या योजनेत पाच व नळ योजनेचे केवळ एक काम यावर्षीच्या उन्हाळ्यात पुर्ण झाले आहे. टंचाईच्या कामांना यावर्षी मरगळ आल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मात्र पाणीटंचाईचा परिणाम कमी जाणवल्याचे चित्र आहे.
मागच्या वर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाचशेच्यावर विहीर व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले होते. तर ७६ टँकरने विविध गावांत पाणीपुरवठा करण्यात आला होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात झालेल्या अवेळीच्या पावसाने भुर्गभातील पाणीपातळी वाढली. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईचा परिणाम कमी प्रमाणात जाणवला. नेहमीच्या गावाच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तर बोअरचे अधिग्रहणही कमी प्रमाणात झाले.
पावसाळा सुरू असल्याने कामे थांबली
टंचाई कृती आराखड्यामध्ये ३८ कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाली नाही तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे टंचाईच्या कामांना फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यात तीन लाखाच्या आतील केवळ सहा कामे पुर्ण झाली आहेत. इतर कामे मात्र पुर्ण झाली नाहीत. नळ योजना दुरूस्तीचे ३७ कामे व तात्पुरती पुरक नळ योजनेची ७७ कामे रखडली आहेत. यातील तीन लाखाच्या वरील कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्यानी ही कामे थांबणार आहेत.
हेही वाचा - coronavirus : हिंगोलीतील सेनगावात नवे पाच रुग्ण, तीन जण कोरोनामुक्त
खाजगी विहीर व बोअरवेलची संख्या घटली
यावर्षी जिल्ह्यात पाणी टंचाईचा परिणाम कमी जाणवला. नेहमीच्या गावातच पाणीपुरवठा करावा लागला. यात औंढा नागनाथ तालुक्यातील तीन गावात दोन टँकरने तर कळमनुरी तालुक्यातील गावात टँकरने पाणीपुरवठा झाला आहे. हे टँकर आता बंद करण्यात आले आहेत. तसेच पाचही तालुक्यात १४६ बोअरवेल व विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले, अद्यापही ते सुरू आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र टँकर खाजगी विहीर व बोअरवेलची संख्या घटली आहे.
हेही वाचा - महावितरणच्या संवाद मेळाव्यात काय घडले ?...वाचा
अधिग्रहण केलेल्या बोअर, विहिरींना पाणी
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने नदी नाल्यांना आलेले पुर याचा फायदा भुर्गभातील पाणीपातळी वाढीस झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न जाणवला नाही. यामुळे कोरोनाच्या काळात ज्या गावात नळ योजना आहे, त्या गावातील नागरिकांना नळद्वारे घरपोच पाणी मिळाले आहे. तर ज्या गावात अधिग्रहण केलेल्या बोअर व विहिरींनादेखील पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसल्याचे चित्र जिल्ह्यात होते.