
गडचिरोली : येथील गडचिरोली-आरमोरी महामार्गावर काटली गावाजवळ पहाटे ५.३० वाजता काळीज पिळवटून टाकणारा अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकने सहा युवकांना चिरडले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर शोकसंतप्त नागरिकांनी या महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तरच आंदोलन मागे घेऊ असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला.