कुंभार पिंपळगाव जि. जालना - येथील बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ज्ञानेश्वर मधुकर दहिवाळ यांच्या ज्ञानेश्वर ज्वेलर्स या दुकानाच्या शटरचे लॉक तोडुन आत प्रवेश करून सराईत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी १९ लाख ७६ हजार पाचशे रूपयांचे सोन्याचांदीचे विविध दागिने लांबवले.