
माहूर : येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राबवण्यात येणारा स्कायवॉक प्रकल्प दीड वर्षापासून रखडला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष प्रथम जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.