Beed News: प्रवाशांची स्मार्ट लूट; १९९ कार्डासाठी जादा वसुली; नियमांची पायमल्ली करत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; कारवाईचा इशारा

Overcharging at Beed Bus Station: बीड बसस्थानकावर प्रवाशांवर सुरू असलेली स्मार्ट कार्डची लूट; १९९ रुपये शुल्क असताना एजंट २३० ते २५० रुपये वसूल करत आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: बसस्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ... उन्हाच्या तडाख्यात रांगेत उभे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि महिला... हातामध्ये कागदपत्रांचा जुडगा आणि चेहऱ्यावर सवलतीच्या स्मार्ट कार्डची ओढ. अशातच एखादा एजंट येतो, हळूच कानात सांगतो, रांगेत उभे राहू नका, अर्ध्या तासात कार्ड देतो, फक्त थोडे जास्त पैसे लागतील. हतबल झालेला प्रवासी नाईलाजास्तव जादा पैसे मोजतो आणि इथेच सुरू होते स्मार्ट लूट!

राज्यातील एसटी प्रवासात सवलतीसाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्ड नोंदणीच्या नावाखाली आता बीड बसस्थानकावरही प्रवाशांची उघड लूट सुरू झाली आहे. शासनाने या कार्डासाठी १९९ रुपये शुल्क निश्चित केले असताना, बीडमध्ये मात्र प्रवाशांकडून चक्क २३० ते २५० रुपये उकळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com