

Hingoli Smart Meter
esakal
परभणी: जिल्ह्यात वीज वितरण क्षेत्रात महत्त्वाचा बदल घडत असून महावितरण राबवत असलेल्या स्मार्ट वीज मीटर योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीमुळे ग्राहकांना वीज वापरावर अधिक नियंत्रण मिळाले असून बिलिंग प्रक्रियाही अधिक पारदर्शक झाली आहे. विशेष म्हणजे ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) प्रणाली लागू केल्यानंतर अनेक ग्राहकांनी आपल्या वीज वापराच्या सवयींत बदल केल्याने एका वर्षात एक कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.