Bidkin Crime : बिडकीनमध्ये प्रतिबंधित पान मसाल्याची तस्करी उघड; दोन जणांना अटक, ९.५० लाखांच्या कारसह ११.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेल्या प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची खुलेआम वाहतूक करणाऱ्या दोघांना बिडकीन पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Smuggling of Banned Pan Masala Exposed in Bidkin Two Arrested

Smuggling of Banned Pan Masala Exposed in Bidkin Two Arrested

sakal

Updated on: 

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेल्या प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची खुलेआम वाहतूक करणाऱ्या दोघांना बिडकीन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लोहगाव-बिडकीन रस्त्यावरील तोंडोळी गावाजवळ बुधवारी (ता. २५) पोलिसांनी विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉस कारवर छापा टाकला. कारमध्ये विविध नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत ९ लाख ५० हजार रुपये किमतीच्या वाहनासह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...