मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा, दवाखान्यात नेताना...... | Jalna News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Snake Bites Boy In Jalna

मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा, दवाखान्यात नेताना...

भोकरदन (जि.जालना) : घरासमोर मित्रांसोबत खेळत असलेल्या एका चिमुकल्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील भायडी येथे बुधवारी (ता.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. रुद्र भरत जंजाळ (वय आठ ) असे सर्पदंश (Snake Bite) झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तालुक्यातील भायडी येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिकणारा रुद्र हा बुधवारी सायंकाळच्या वेळेला नेहमीप्रमाणेच आजी, आजोबा आणि मित्रांसोबत घराजवळील अंगणात खेळत असतांना अचानक त्याला सापाने चावा घेतला. (Snake Bite Eight Years Old Boy While Playing With Friends In Bhokardan Taluka Of Jalna)

हेही वाचा: हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समाजानं बनलाय भारत - अकबरुद्दीन ओवैसी

त्यामुळे त्याला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, साप विषारी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच सिल्लोडजवळ त्याची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा: घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

रुद्र हा अत्यंत हुशार व बोलका असल्याने गावात व शाळेत तो सर्वांचा लाडका होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Snake Bite Eight Years Old Boy While Playing With Friends In Bhokardan Taluka Of Jalna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalnaBhokardansnake
go to top