संकट काळातही जपले सामाजिक भान

सुरेश घाळे
सोमवार, 6 एप्रिल 2020


लॉकडाउनमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शहरातील सिंहनाद युवक प्रतिष्ठानतर्फे शहरातील फुलेनगर, शास्त्रीनगर, रामनगर, देवी गल्ली, सरस्वतीनगर, शंकरगंज, वडारगल्ली आदी परिसरातील १५१ कुटुंबांना गहू, तांदूळ, साबण, डाळ, तेल, मास्क आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. 

धर्माबाद, (जि.नांदेड) ः ‘कोरोना’ने देशासह राज्यात थैमान घातल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धर्माबाद तालुक्यातील गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सिंहनाद युवक प्रतिष्ठान धर्माबादचे अनुपसेठ कासलीवाल यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनश्याक वस्तूंचे वाटप सोमवारी (ता. सहा) करण्यात आले. शहरातील १५१ गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करून संकटकाळातही सामाजिक भान सिंहनाद युवक प्रतिष्टानने जपले आहे.

 

हेही वाचा -  ‘वरद’ने वाढदिवस नाकारला

देशात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शहरातील सिंहनाद युवक प्रतिष्ठानतर्फे शहरातील फुलेनगर, शास्त्रीनगर, रामनगर, देवी गल्ली, सरस्वतीनगर, शंकरगंज, वडारगल्ली आदी परिसरातील १५१ कुटुंबांना गहू, तांदूळ, साबण, डाळ, तेल, मास्क आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. 

 

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड, मुंबई पोलिस निरीक्षक रवी बोलमवार, अनुपसेठ कासलीवाल, नरेश शिरलावार, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हनमंते, सचिव सुरेश घाळे, पोलिस कर्मचारी शब्बीर शेख, चेतन सोनी, संतोष येरावार, महेंद्र पांडे, राजू गोडगुलवार, मनोज काले, राजू वानखेडे, साईनाथ शिरपुरे, छोटू पाटील, शेखलाल, सूर्यकांत राखोंडे, जैन युवा संघटनेचे महावीर लोहाडे, अनुप कासलीवाल, प्रणय पहाडे, अंकित गोधा, अमन पांडे, लोकेश गोधा, अमित कासलीवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

 

युवक प्रतिष्टानचे सर्वत्र कौतुक
यावेळी महावीर जयंती निमित्ताने जैन युवा संघटना यांच्या परिवाराकडून ३०० सनिटायझरचे २०० एमएलच्या बॉटल व ३०० मास्क चे वाटप करण्यात आले. कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे सिंहनाद युवक प्रतिष्टानचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social awareness preserved even in times of crisis, nanded news